Psalms 112

1परमेश्वराची स्तुती करा.
जो माणूस परमेश्वराच्या आज्ञा पाळतो,
जो त्याच्या आज्ञेत मोठा आनंद करतो, तो आशीर्वादित आहे.
2त्याचे वंशज पृथ्वीवर शक्तिमान होतील;
धार्मिक आशीर्वादित होतील.

3धन व श्रीमंती त्यांच्या घरात आहेत;

त्यांचे नितीमत्त्व सर्वकाळ टिकते.
4धार्मिक माणसांसाठी अंधकारात प्रकाश चमकवतो;
तो दयाळू, कृपाळू आणि न्यायी आहे.
5जो माणूस दया करतो आणि उसने देतो,
जो प्रामाणिकपणे वागून आपला व्यापार करतो त्याचे चांगले होते.

6कारण तो माणूस कधीही हलणार नाही;

नितीमान माणसाची आठवण सर्वकाळ राहील.
7तो वाईट बातमीला भिणार नाही;
त्याचा परमेश्वरावर भरवसा असून त्याला खात्री आहे.

8त्याचे हृदय निश्चल आहे,

आपल्या शत्रूवर विजय मिळालेला पाहीपर्यत तो भिणार नाही.
9तो गरीबांना उदारपणे देतो;
त्याचे नितीमत्त्व सर्वकाळ राहील;
तो सन्मानाने उंचविला जाईल.

दुष्ट माणसे हे पाहतील आणि रागावतील;

तो आपले दात खाईल आणि विरघळून जाईल;
दुष्टाची इच्छा नाश होईल.
10

Copyright information for MarULB